शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी गोपनीय अहवाल भरलेला नमुना । gopaniy ahwal

Sunil Sagare
0

गोपनीय अहवाल pdf २०२४ । gopaniy ahwal


    प्रत्येक कर्मचाऱ्याच्या  वर्षभरातील कामाचे मूल्यमापन त्याचे वरिष्ठ अधिकारी  गोपनीय अहवालाच्या स्वरूपात करतात. शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत हा कालावधी १ एप्रिल २०__ ते ३१ मार्च २०__ असा असतो. यालाच प्रतिवेदन कालावधी असे म्हणतात.

सध्या प्रचलित असलेला गोपनीय अहवालाचा फॉरमॅट दि. ०७-०२-२०१८ च्या शासन निर्णयानुसार बनवलेला आहे.

भाग १ (पहिली दोन पाने) (कार्यालय प्रामुख्याने भरावयाची असून त्यात खालील नोंदी कराव्यात.)


१.मूल्यमापन कालावधी - १ एप्रिल २०__ ते ३१ मार्च २०__  असा लिहावा.
२.कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव लिहावे.
३.संवर्ग - कर्मचाऱ्याचा (Cadre) पदाचा संवर्ग लिहायचा  आहे.  category असा उल्लेख नाही. 
४. कर्मचाऱ्याचे पद  लिहावे.
५.  सध्याच्या पदावर नियुक्ती दिनांक 
६. कार्यालयाचे नाव लिहावे.

७. प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील 
(प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत प्रतिवेदन अधिकारी - पात्र/ग्रेड मुख्याध्यापक  अथवा केंद्र प्रमुख, पुनर्विलोकन अधिकारी - विस्तार अधिकारी अथवा गट शिक्षणाधिकारी )
८. कर्मचाऱ्याच्या रजेचा  तपशील 
९. प्रशिक्षणाचा तपशील 
१०. मत्ता व दायित्व विवरण विषयक तपशील 

भाग २ : स्वयंमूल्य निर्धारण अहवाल  (कर्मचाऱ्याने स्वतःच्या अक्षरात भरावा.)

१. पदाला निश्चित करून दिलेली कामे त्यांचा उल्लेख  - 

जसे (शिक्षकांच्या बाबतीत ) अभ्यासक्रम पूर्ण करणे. 
१००% पटनोंदणी व उपस्थिती ठेवणे. 
सहशालेय उपक्रम राबवणे. 
विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे. व गुणवत्ता विकास करणे. 
अध्ययन निष्पत्तीनुसार अध्ययन अनुभव देणे. 
वर्षभराच्या शैक्षणिक कामाचे वार्षिक/ मासिक/ दैनिक नियोजन तयार करणे. 
नियोजनानुसार अभ्यासक्रम पूर्ण करणे. इत्यादी 

२.  प्रतिवेदनाच्या कालावधीकरिता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्ट्ये -
मूल्यमापनाच्या कालावधीच्या वर्षात शासनामार्फत राबविलेले विशेष उपक्रम व त्याबाबत कर्मचाऱ्याला ठरवून दिलेली उद्दिष्ट्ये.
जसे- 
सेतू अभ्यासक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करणे. 
 विहित कालावधीत विद्यार्थ्यांच्या अध्ययन  स्तरामध्ये सुधारणा करणे.
अध्ययन स्तरामध्ये सुधारणा करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे.
वेळोवेळी अध्ययन स्तर निश्चिती करून कृती आराखडा नूतनीकरण करणे.
अध्ययन निष्पत्तीनुसार विद्यार्थ्यांना उच्चतम अध्ययन स्तरावर नेण्यासाठी कृती आराखड्यानुसार विविध उपक्रम राबविणे.

३. वर्षभरात पार पाडलेल्या उल्लेखनीय कामांची माहिती येथे लिहावी.

४. उद्दिष्ट्ये पूर्ण करताना आलेल्या अडचणी चा उल्लेख येथे करावा.

५. कर्मचाऱ्यास कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे त्याचा उल्लेख करावा.

६. मागच्या वर्षीच्या ३१ मार्च साठी मत्ता व दायित्व विवरण सादर केले आहे काय?

७. कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी 

भाग ३ : प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहावयाचा मूल्यमापन अहवाल 

भाग ४ : पुनर्विलोकन अधिकाऱ्याचे मूल्यमापन 

कर्मचाऱ्याचा मूल्यमापन अहवाल कसा लिहावा व त्याचे गुणांकन कसे करावे एकविषयी मार्गदर्शक pdf  फाईल खालील लिंक वर उपलब्ध आहे.

गोपनीय अहवाल मार्गदर्शन 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top