शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मत्ता व दायित्व फॉर्म विवरण भरणे। matta v dayitva in marathi pdf

Sunil Sagare
0

 मत्ता व दायित्व विवरण कसे भरावे?



शासकीय कर्मचाऱ्यांना प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच ३१ मार्च पर्यंत त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्ता व दायित्व (देणे) याची  कार्यालयास सादर करावी लागते. मत्ता व दायित्व विवरण दाखल करणे पुढील वेतन वाढ, पदोन्नती साठी बंधन कारक असते.
मत्ता व दायित्व विवरण फॉर्ममध्ये  एकूण ३ प्रपत्र असतात. हे तिन्ही प्रपत्र कसे भरावे याची सविस्तर माहिती आपण घेऊया.

प्रपत्र १ : अचल मालमत्तेचे विवरण 

अचल मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी एका जाग्यावरून दुसऱ्या जागी हलवता/स्थलांतरित करता येत नाही. 
जसे शेतजमीन, प्लॉट, घर  इत्यादी 

या प्रपत्रामध्ये एकूण ९ स्तंभ असतात.

 स्तंभ २ - कर्मचाऱ्याने चालू वर्षाच्या दि ३१ मार्च पर्यंत त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबियांच्या मालकीच्या/ भाड्यावर अथवा                   लीज वरघेतलेल्या अचल मालमत्तेचा पत्ता, 
स्तंभ ३ - तपशील जसे क्षेत्रफळ-प्रकार, 
स्तंभ ४ - अंदाजित(वारसा हक्काने मिळालेली असल्यास)/खरेदी  किंमत, 
स्तंभ ५ - सध्याची किंमत,
स्तंभ ६ - भाडे अथवा लीज वर घेतलेले असल्यास त्याचे वार्षिक भाडे, सदर मालमत्ता कोणाच्या नावे आहे, 
स्तंभ ७ - मालमत्ता कोणाकडून घेतली त्याचे नाव व पत्ता 
स्तंभ ८ - मालमत्तेपासून मिळणारे वार्षिक उत्पन्न रक्कम रु .


प्रपत्र २ : चाल मालमत्तेचे विवरण

अचल मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी एका जाग्यावरून दुसऱ्या जागी सहज  हलवता/स्थलांतरित करता येते.
जसे रोख रक्कम, दागिने, दुचाकी / चारचाकी वाहन, बँक खाते अथवा इतरत्र गुंतवलेली रक्कम भ. नि. नि. अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेत जमा रक्कम, विमा पॉलीसी, आवर्त ठेवी, शेअर्स  या सर्वांचे विवरण या प्रपत्रात भरावे.

या प्रपत्रामध्ये एकूण ५ स्तंभ/रकाने असतात. सदर प्रपत्रात खालील बाबींचा समावेश असावा.

हि माहिती स्तंभ क्र नुसार खालील प्रमाणे भरावी.
स्तंभ १ अनुक्रमांक 
स्तंभ २ मालमत्तेचे वर्णन - आवर्त ठेव (RD )
स्तंभ ३ मालमत्तेचा तपशील - बँकेचे नाव, शाखा व पत्ता 
स्तंभ ४ मालमत्तेचे मूल्य - रक्कम रु. मध्ये लिहावे.
स्तंभ ५ कोणाच्या नावे - स्वतः;च्या/पत्नी/आई/वडील/मुलांच्या 

प्रपत्र ३ : दायित्वाचे (Liability) विवरण 

दायित्व म्हणजे एखाद्याचे देणे असणे किंवा कर्मचाऱ्याने घेतलेले कर्ज, उसने, अग्रीम याची माहिती.

या प्रपत्रामध्ये एकूण ६ स्तंभ/रकाने असतात. सदर प्रपत्रात खालील बाबींचा समावेश असावा.

कर्जाचे विवरण देताना दोन माहिन्यांच्या मूळ वेतनाच्या रकमेपेक्षा अधिक असणारी  कर्जाची रक्कम नमूद करावी, त्यापेक्षा कमी रकमेच्या कर्जाचा उल्लेख/विवरण करणे गरजेचे नाही.
यात विविध कारणांसाठी घेतलेल्या अग्रीम रकमेचे विवरण देणे गरजेचे आहे.

प्रत्येक स्तंभ क्रमांकानुसार खालील प्रमाणे विवरण पत्रात माहिती भरावी.
स्तंभ १  अनुक्रमांक 
स्तंभ २  दायित्वाची रक्कम - कर्जाची एकूण रक्कम
स्तंभ ३  धनकोचे नाव व पत्ता - कर्ज देणाऱ्याचे / बँकेचे नाव, शाखा व पत्ता 
स्तंभ ४  दायित्व पत्करल्याचा दिनांक -कर्ज घेतल्याचा दिनांक 
स्तंभ ५ व्यवहाराचा तपशील - कशासाठी कर्ज घेतले/ किती कर्ज शिल्लक आहे इत्यादी 

वरील सर्व प्रपत्र दि. ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून ३१ मे  पर्यंत सादर करावीत.

मत्ता व दायित्व फॉर्म pdf 





टीप - सदरील माहिती मार्गदर्शक स्वरूपाची असून त्याची खात्री वाचकांनी योग्य स्रोतांकडून  करून घ्यावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top