शालेय पोषण आहार : MDM excel software 2024-25

Sunil Sagare
0

     




शालेय पोषण आहार योजना (नवीन नाव प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना )  शालेय मुलांची पटनोंदणी, उपस्थिती वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावते. या योजने अंतर्गत भारतातील सर्व शालेय मुलांना मध्यान्ह भोजनात पोषक आहार दिला जातो. १३ लाख शाळांमध्ये चालवली जाणारी  आणि  १२ कोटी  मुलांना सेवा देणारी, MDM ही जगातील सर्वात मोठी योजना आहे.

 या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय स्तरावर प्राप्त धान्य व धान्यादी मालाचा मासिक व वार्षिक नोंदी व हिशोब ठेवावा लागतो. हे सर्व रेकॉर्ड ठेवणे हे वेळखाऊ व गुंतागुंतीचा हिशोब असणारे काम आहे. शाळा स्तरावर पोषण आहाराचा हिशोब ठेवणे सोपे जावे, हिशेब व ताळेबंद अचूक व्हावा. व मासिक व वार्षिक हिशोब कमी वेळेत व्हावा म्हणून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी हे  शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर या ब्लॉग द्वारे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.


MDM Excel Software Software Download

यावर्षीचे नवीन अपडेट / बदल । What's New ? :

    यावर्षीच्या नवीन आवृत्तीमध्ये धान्यादि मालाची मागणी तयार करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. 

मागणी कशी तयार करावी?

१. मुख्य मेनू मधील मागणी मेनू वर क्लिक करा 
२. मागील शिल्लक घेण्याचा महिना ड्रॉप डाऊन मधून निवडा 
३. १  ते ५  आणि ६ ते ८ चा पट टाका 
४. मागणीचे दिवस भरा (तांदूळ व ज्या कडधान्याची मागणी करायची आहे त्याचे)
५. मागील शिल्लक घेण्याचा महिना पूर्ण झाला नसेल तर शिल्लक शालेय दिवस टाका.
६. सर्व माहिती भरून झाल्यानंतर Magani_print वर क्लिक करा.
७. प्रिंट मध्ये मागणी साठी हवे असलेली कडधान्ये ड्रॉप डाऊन मधूनच निवडा.
८. प्रिंट काढा.

शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर  २०२४-२५ ची इतर वैशिष्ट्ये :

अ.     १ ली ते ८ वी साठी एकच सॉफ्टवेअर :

 या सॉफ्टवेअर मध्ये १ ली ते ५ वी, vi  ६ वी  ते ८ वी साठी चा पोषण आहार हिशोब एकाच एक्सेल फाईल मध्ये पण वेगवेगळा ठेवता येतो. तसेच फक्त १ ली ते ५ वी साठीही ही फाईल वापरता येते. जेथे फक्त लहान वर्ग आहेत तेथील शाळेने फक्त १ ली ते ५ वी शी संबंधित मेनू वापरावा. 

ब.     नोंदवही : 

     शालेय पोषण आहाराचा दैनंदिन हिशोब दररोजची विद्यार्थी उपस्थिती, ताटांची संख्या, तांदूळ व धान्यादी मालाच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदी या वहीत असतात. नोंदवही भाग १ मध्ये दैनंदिन खर्च व शिल्लक तांदूळ नोंदवला जातो. व नोंदवही भाग २ मध्ये उपस्थित विद्यार्थी, ताटांची संख्या आणि दैनंदिन धान्यादी मालाच्या खर्चाच्या नोंदी ठेवलेल्या असतात. शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर मध्ये संबंधित महिन्यात नवीन धान्य आले असल्यास ते नोंदवून घ्यावे. व नंतर फक्त दररोजचा हजर पट टाकावा, इतर सर्व खर्चाचा हिशेब आपोआप नोंदविला जातो.

क.      आठवड्यातील प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्यात वेगळे प्रमाण व मेनू  ठेवण्याची सोय :

  काही स्थानिक शासन संस्थांच्या शाळांमध्ये प्रशासन मसाले किंवा तेलाचे प्रमाण व दैनंदिन मेनू वारानुसार वेगळा ठरवून दिलेला असतो. ही बाब लक्षात घेऊन या सॉफ्टवेअर मध्ये प्रत्येक महिन्याला, वारानुसार, सर्व धान्य, मेनू निश्चित करण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी महिन्यातून एकदाच आठवड्यातील वारानिहाय धान्य व मसाले प्रमाण एकदाच नोंदवावे.
(एखाद्या महिन्यात पूर्वीच्या महिन्याप्रमाणे मेनू व प्रमाण असेल तर पूर्वीच्या महिन्याचा मेनू व प्रमाण कॉपी पेस्ट करावे.) त्यानंतर फक्त आलेला स्टॉक व दररोजची हजेरी नोंदवावी. वारानुसार, तुम्ही दिलेले प्रमाण व मेनूनुसार, सॉफ्टवेअर आपोआप दैनंदिन नोंदी घेते. १ ली ते ५ वी आणि ६ वी  ते ८ वी साठी वेगवेगळ्या मेनू मध्ये वारानिहाय मेनू व प्रमाण सेट करावे.

शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

ड.     मासिक अहवाल :

    या शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर मध्ये अतिशय सोपा व सुटसुटीत मासिक अहवाल मिळवण्याची सोय केली आहे. ज्या महिन्याचा मासिक अहवाल हवा आहे. ड्रॉप डाऊन मधून तो महिना निवडल्यास एका क्लिक वर शालेय पोषण आहाराचा मासिक अहवाल हा A४ कागदावर प्रिंट काढता येतो. १ ली ते ५ वी आणि ६ वी  ते ८ वी साठी वेगवेगळे अहवाल काढता येतात.

ई.      वार्षिक अहवाल : 

 वर्षाच्या शेवटी मार्च अखेर वर्षभराच्या पोषण आहाराचा हिशोब करावा लागतो. अनेकदा या हिशोबाचा ताळमेळ बसवताना दमछाक होते. व खूप वेळही वाया जातो. शालेय पोषण आहार एक्सेल फाईल सॉफ्टवेअर मध्ये हा वार्षिक हिशोब अचूक ताळमेळासह एका क्लिक वर A४ कागदावर प्रिंट काढता येतो. त्याचबरोबर धान्यनिहाय वेगवेगळा वार्षिक अहवालही तयार करण्याची सोय या सॉफ्टवेअर मध्ये करण्यात आली आहे. १ ली ते ५ वी आणि ६ वी  ते ८ वी साठी वेगवेगळे अहवाल काढता येतात.

फ.     कोणत्याही वर्षी वापरास योग्य :

    हे एक्सेल सॉफ्टवेअर  कोणत्याही वर्षासाठी वापरू शकता. यासाठी फक्त मुख्य मेनू वरील शैक्षणिक वर्ष बदला, त्या वर्षातील महिन्यानुसार वार आपोआप बदलतील.

ग .       पोषण आहार मागणी :

   एक्सेल वापराची चांगली माहिती असल्यास या सॉफ्टवेअर द्वारे मागणीही लगेच तयार करता येते. मागणी मेनू मध्ये जाऊन ज्या महिन्याच्या शिलकीवर मागणी करायची आहे तो महिना ड्रॉप डाऊन मधून निवडावा, मागणी चे दिवस, वारानिहाय/ कडधान्य निहाय दिवस टाकावेत. मागणी पेज वर मागणीचे प्रमाण टाकावे(आठवड्यातील वारानुसार बदलणाऱ्या धान्यादी मालाचे प्रमाण टाकताना सरासरी करून टाकावे.), ज्या तारखेच्या शिलकीवर मागणी करायची आहे, त्या तारखेपर्यंतचे एकूण शिल्लक दिवस व कडधान्य/वारानिहाय शिल्लक दिवस मागणी दिवसाच्या वरील रकान्यांमध्ये टाकावेत. व नंतर जी कडधान्य मागायची आहेत, ती संख्या  मागणी  प्रिंट पेज वरील कडधान्य कॉलम मध्ये फॉर्मुला(= चिन्ह वापरून )  वापरून, पाहिजे त्या कडधान्याची संख्या घ्यावी, कॉलम वरील कडधान्याचे नाव बदलावे,  पट बरोबर असल्याची खात्री करावी.  व प्रिंट काढावी.
     एक्सेल वापराबद्दल कमी माहिती असल्यास मागणी पेज वरील तयार झालेले आकडे कागदावर लिहूनही काढू शकता. 

याशिवाय ...

- लातूर जि. प. शाळांसाठी दर महिन्याला लागणारे मासिक बिलही एका क्लिक वर तयार होते.



वापरताना घ्यावयाची काळजी :

१. मासिक रिपोर्ट, मागणी शीट, मासिक बिल ची शीट व जिथे जिथे ड्रॉप डाऊन मधून महिना बदलून रिपोर्ट तयार होतो, त्या शीट मध्ये लाल किंवा गुलाबी रंगात असलेल्या सेल मधील अक्षरे डिलीट करू नयेत. तसे झाल्यास ड्रॉप डाऊन मधून महिना बदलल्यास त्यानुसार रिपोर्ट येणार नाही.

२. फाईल मधील प्रत्येक  ० असलेल्या ठिकाणी फॉर्मुला टाकलेला आहे. तो डिलीट करू नये अथवा हाताने बदलू नये. तसे झाल्यास संपूर्ण सॉफ्टवेअर मधील पोषण आहाराचं हिशोब चुकू शकतो.

३. चुकून एखाद्या ठिकाणाचा फॉर्मुला बदलल्यास अथवा डिलिट झाल्यास या ब्लॉग वरून नवीन फाईल डाउनलोड करून घ्यावी. व त्यातील फॉर्मुला कॉपी-पेस्ट करावा. (पेस्ट करताना फक्त फॉर्मुला पेस्ट होईल याची काळजी घ्यावी.)

शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर पर्यायी डाउनलोड लिंक साठी येथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top