नियोजन हा शालेय शिक्षण प्रक्रियेचा अविभाज्य व महत्वाचा भाग आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्व वर्ग शिक्षकांना नेमून दिलेल्या वर्गाचे वार्षिक नियोजन, घटक नियोजन व दैनंदिन नियोजन करावे लागते. याशिवाय शालेय पूर्वतयारीचा एक महत्वाचा भाग म्हणजे वर्गाचे वेळापत्रक होय. प्रत्येक विषयाला ठरवून दिलेल्या साप्ताहिक तासिकांची संख्या, तसेच आठवड्यात वर्गासाठी उपलब्ध तासिकांची संख्या, वर्गात शिकवायचे विषय या सर्व बाबींचा विचार करून वर्गाचे साप्ताहिक वेळापत्रक वर्गशिक्षक बनवतात.
दि.०५-१०-२०१७ च्या शासकीय परिपत्रकानुसार इयत्ता १ ली ते १० वी साठी प्रत्येक आठवड्याला ४८ तासिका नेमून दिलेल्या आहेत. या परिपत्रकानुसार सोमवार ते गुरुवार दररोज ८ तासिका, शुक्रवारी ९ तासिका व शनिवारी ७ तासिका ठरवून दिलेल्या आहेत. आठवड्यातील या ४८ तासिकांपैकी प्रत्येक विषयाला किती तासिका असाव्यात हेही या परिपत्रकानुसार निश्चित केलेले आहे. आपल्या वर्गाचे वेळापत्रक बनवताना वरील तासिका विभागणी लक्षात घेऊन वर्गशिक्षकांना वेळापत्रक तयार करावे लागते. संबंधित तासिका विभागणी परिपत्रक तुम्ही खालील लिंक वर पाहू शकता.
तासिका विभागणी परिपत्रक दि. ०५-१०-२०१७ पीडीएफ
इयत्ता १ ली ते ८ वी शालेय वेळापत्रक नमुना एक्सेल फाईल
वर्गशिक्षकांना आपल्या वर्गाचे वेळापत्रक बनवण्यासाठी सोपे व्हावे म्हणून इयत्ता पहिली ते आठवी साठी नमुना वेळापत्रक असलेली एक्सेल फाईल बनवली आहे. या नमुना वेळापत्रकाचा मदतीने आपण कमीत कमी वेळेत व अचूकरीत्या तुमच्या वर्गाचे वेळापत्रक बनवू शकता. शासकीय परिपत्रकातील तासिका विभागणीनुसार प्रत्येक विषयाला तासिका देता याव्यात म्हणून यात फॉर्मुल्या सह पडताळणी टाकता दिलेला आहे. आपण तासिकांमध्ये विषयांची वाटणी करताना हा फॉर्मुला प्रत्येक विषयाला किती तासिका येत आहेत ते आपोआप मोजतो व त्याची तुलना परिपत्रकानुसार निश्चित संख्येशी करतो.
नमुना एक्सेल फाईल वापरून वेळापत्रक कसे बनवावे याविषयी मार्गदर्शन ..
१. स्थानिक परिस्थितीनुसार तासिका, सुट्टी ची वेळ बदल करावी.
२. इयत्तेनुसार तासिका विभागणी वेळापत्रकात समाविष्ट आहे.
३. शाळेचे नाव, इयत्ता सोयीनुसार बदलून घ्या.
वेळापत्रकातील विषयांच्या तासिका बदलणे
१. तासिकांचे विषय वर्गाशिक्षकांच्या सोयीनुसार बदलताना सोपे व्हावे म्हणून प्रत्येक वेळापत्रकसोबत तासिका संख्या पडताळणी तक्ता दिलेला आहे.
२. पडताळणी तक्त्यामध्ये विषयांच्या तासिका मोजणारा फॉर्म्युला टाकलेला आहे.
३. डाव्या बाजूला (वेळापत्रकामध्ये) शासकीय परिपत्रकानुसार विषयनिहाय ठरवून दिलेल्या तासिकांची संख्या दिलेली आहे.
४. उजव्या बाजूच्या पडताळणी तक्त्यामधील फॉर्म्युला वेळापत्रकात शिक्षकांनी प्रत्यक्ष वाटप केलेल्या विषयांच्या एकूण तासिकांची संख्या मोजतो.
५. तासिकांची संख्या परिपत्रकानुसार दिलेल्या तासिकांच्या संख्येशी जुळल्यास पडताळणी तक्त्यामध्ये तासिकांच्या संख्येसमोर √ असे चिन्ह येते व चिन्ह असलेल्या सेल चा रंग हिरवा होतो.
६. तासिकांची संख्या न जुळल्यास पडताळणी तक्त्यामध्ये तासिकांच्या संख्येसमोर X असे चिन्ह येते. व चिन्ह असलेल्या सेल चा रंग लाल होतो.
७. वेळापत्रकातील विषयाचे नाव सर्व ठिकाणी सारखे(र्हस्व-दीर्घसह) असेल तरच पडताळणी तक्त्यामधील फॉर्म्युला काम करतो. अन्यथा चुकीची संख्या दाखवतो.
८. पडताळणी तक्त्यामध्ये सर्वत्र फॉर्म्युला द्वारे माहिती येते. त्यामुळे फक्त वेळापत्रकातील भागामध्ये बदल करावा. पडताळणी तक्त्यामध्ये कोठेही बदल करू नये.
प्रिंट काढणे
१. वेळापत्रक A4 साइज च्या कागदावर आडवे प्रिंट काढण्यासाठी सेटअप केले आहे.
२. प्रिंट सेटअप मध्ये पडताळणी तक्ता दुसर्या पानावर येतो, त्याची प्रिंट काढण्याची गरज नाही.
इयत्ता १ ली ते ८ वी शालेय वेळापत्रक pdf