शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर ही फाईल दैनंदिन धान्य साठा नोंदवही चा हिशोब ठेवण्यासाठी बनवण्यात आले आहे. या एक्सेल फाईल च्या मदतीने तुमचे शालेय पोषण आहाराचा दैनंदिन, मासिक आणि वार्षिक हिशोब ठेवणे अत्यंत सोपे व सुट सुटीत होईल. सोबत मासिक अहवाल, धान्य मागणी, मासिक बिले आणि वार्षिक फॉरमॅट ही आपोआप तयार होतील व त्याची प्रिंट ही काढता येईल. आणि हिशोब अचूक व सुटसुटीत होतो. शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड ठेवणे सोपे जाईल.
शालेय पोषण आहार फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
फाईल वापराविषयी मार्गदर्शन
1 हे एक्सेल सॉफ्टवेअर फक्त मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2010 व त्यापुढील ऑफिस च्या व्हर्जन मध्येच चालते.
(ऑफिस 2007 मध्ये ड्रॉप डाउन मेनू काम करणार नाहीत)
2 पहिल्या settings शीट मध्ये सर्व मूलभूत माहिती स्थानिक परिस्थितीनुसार बदलून घ्या.
जसे शाळेचे नाव,पत्ता, सन, पट, धान्य प्रमाण, कडधान्य व मेन्यूची नावे इत्यादि
येथे टाकलेली मेन्यूची नावे पुढे नोंदवही भाग 2 मध्ये निवडण्यासाठी ड्रॉप डाउन मध्ये दिसतात.
3 एखाद्या महिन्यात प्रमाण बदलल्यास तसा बदल करण्याची सोय प्रत्येक महिन्याच्या भाग 2 च्या
रो मध्ये बदलता येतात.
4 वर्षाच्या सुरुवातीच्या (एप्रिल) महिन्याच्या नोंदवही भाग 1 व भाग 2 मध्ये मागील शिल्लक टाकावी.
नंतर प्रत्येक महिन्याला नोंदवही भाग २ मध्ये फक्त प्राप्त कॉलम मध्ये येणारा धान्यादि माल किलोग्रॅम मध्ये टाकावा. मागील शिल्लक आपोआप पुढील महिन्यात येते.
प्राप्त तांदूळ मात्र भाग1 व भाग2 अशा दोन्ही ठिकाणी प्रत्येक महिन्यात टाकावा लागतो.
5 प्रत्येक महिन्यात नोंदवही भाग 1 मध्ये पट व हजर विद्यार्थी संख्या व फक्त प्राप्त तांदूळ फक्त टाकावा.
6 प्रत्येक महिन्याच्या भाग 2 नोंदवही मध्ये दररोजचा मेनू ड्रॉप डाउन मधून निवडावा.
इतर माहिती जसे हजर व पट, मागील शिल्लक इत्यादि भाग 1 मधून आपोआप अपडेट होते.
7 मासिक अहवालाच्या शीट मध्ये ड्रॉप डाउन मधून महिना निवडल्यास त्या महिन्याचा अहवाल
आपोआप अपडेट होतो. त्याच प्रमाणे मासिक बिल ही तयार होते.
8 मागणीच्या शीट मध्ये ज्या महिन्याच्या शिलकीवर मागणी काढायची आहे, तो महिना ड्रॉप डाउन
मधून निवडावा.
9 सर्व मासिक अहवाल, मागणी आणि बिलांच्या शीट्स मध्ये मध्ये लाल रंगाच्या cell मधील मजकूर डिलिट करू नये.
ती cell फोर्मुल्या साठी वापरली आहे. मजकूर डिलिट झाल्यास ड्रॉप डाउन नुसार माहिती
बदलणार नाही.
10 वर्षाच्या शेवटी सर्व वार्षिक अहवाल आपोआप तयार होतील.
VERY GOOD
उत्तर द्याहटवा