शासकीय कर्मचारी अपघात विमा योजना | shasakiy karmchari vayaktik apghat vima yojana

Sunil Sagare
0

 



    राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी फेब्रुवारी २०१७ पासून सुरु करण्यात आली. तसेच ऑगस्ट २०१७ च्या शासन निर्णयानुसार ही योजना निमशासकीय आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली. या योजनेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारीच्या देय वेतनातून दि. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठी वर्गणी रक्कम कपात करावी लागते. कपात करावयाच्या रकमेचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे.


गट राशीभूत विमा रक्कम वार्षिक वर्गणी वस्तू व सेवा कर एकूण वार्षिक वर्गणी
गट अ रु २५ लाख ७५० रु १३५ रु ८८५ रु
गट ब रु २० लाख ६०० रु १०८ रु ७०८ रु
गट क रु १५ लाख ४५० रु ८१ रु ५३१ रु
गट ड रु १५ लाख ४५० रु ८१ रु ५३१ रु

    सदरील वर्गणीची रक्कम ही एक वर्षाच्या कालावधीसाठी असते. शासकीय कर्मचाऱ्याला या योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी दर वर्षी वरील प्रमाणे वर्गणी रक्कम माहे फेब्रुवारी महिन्याच्या देय वेतनातून कपात करावी लागते.
काही कारणास्तव वार्षिक वर्गणी फेब्रुवारी महिन्याच्या देय वेतनातून कपात न झाल्यास पुढील महिन्याच्या देय वेतनातून कपात करता येते. वर्गणी  ज्या महिन्यात कपात होईल त्याच्या पुढील महिन्याच्या १ तारखेपासून सदरील योजना संबंधित कर्मचाऱ्याला लागू होते. तसेच वर्षातील कोणत्याही वेळी कर्मचाऱ्याला या योजनेत सहभागी होता येते. पण विमा कालावधी मात्र ३१ मार्च रोजी संपुष्टात येतो. याशिवाय योजनेत सहभागी होण्यासाठी च्या इतर नियम व अटी, कपात कोणत्या महिन्यात करावी,  यासंबंधी अधिक माहिती ५ मार्च २०१९ च्या शासन निर्णयात दिलेली आहे. सदरील शासन निर्णयाचा सांकेतांक 201903051525305705 असा असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर आपणास पाहता येईल.

    कपात करावयाची वर्गणी माहे फेब्रुवारी च्या देय वेतनातून कपात केल्यानंतर कार्यालय प्रमुख  विहित नमुन्यात सर्व प्रपत्रे कर्मचाऱ्याकडून भरून घेतात. आणि विहित चलनाद्वारे कपात केलेली रक्कम शासनास जमा करतात. व सदरील योजनेत सहभागी झाल्याची नोंद संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत घेतात. 

 राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना संबंधी आजपर्यंतचे सर्व शासन निर्णय, चलन, नमुना प्रस्ताव खालील दिलेले आहेत.

योजने संबंधी डॉक्युमेंट चे नाव लिंक
शासन निर्णय दिनांक १८-०२-२०१७ - योजना सुरु करणे. डाउनलोड
शासन निर्णय दिनांक ११-०८-२०१७ - योजना निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू करणे. डाउनलोड
शासन निर्णय दिनांक १५-०२-२०१८ - वार्षिक वर्गणीवर आकारण्यात येणाऱ्या वस्तू व सेवा कर दराबाबत डाउनलोड
शासन निर्णय दिनांक ०५-०३-२०१९ - नियम सुधारणा डाउनलोड
शासन निर्णय दिनांक २४-०१-२०२३ - वार्षिक वर्गणी व विमा रकमेत वाढीबाबत डाउनलोड
अपघात विमा चलन पीडीएफ डाउनलोड
नमुना प्रस्ताव डाउनलोड

अपघात विमा चलनासोबत भरावयाची प्रपत्रे दिनांक १८-०२-२०१७ च्या शासन निर्णयात जोडलेली आहेत. सदरील प्रपत्र प्रिंट काढून वापरता येतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top