अँड्रॉइड साठी विद्यार्थी व्यवस्थापन प्रणाली । Student Management System for Android
डेमो व्हिडीओ
तुमच्या शाळेच्या/वर्गाच्या विद्यार्थी माहितीचे व्यवस्थापन मोबाईल वर करा !
👩🏼🏫👩🏼🏫👩🏼🏫👩🏼🏫👩🏼🏫👩🏼🏫
सादर आहे....
क्लास मॅनेजर ॲप! 🎓
वैशिष्ट्ये
१. भाषा निवड
👉🏻 क्लास मॅनेजर ऍप मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये वापरता येते. ऍप प्रथमच चालू केल्या नंतर आपणास भाषा निवडण्याची स्क्रीन दिसेल. याद्वारे वापरकर्ता भाषा निवडू शकतो. किंवा नंतरही ऍप च्या सेटिंग मधून सुद्धा भाषा बदलण्याची सोय उपलब्ध आहे.
२. विद्यार्थी माहिती व्यवस्थापन
👉🏻 वर्गातील विद्यार्थ्यांची फोटोसह संपूर्ण माहिती ऍप मध्ये सेव्ह करण्याची सोय व एका टच वर पाहण्याची सोय. जतन केलेली विद्यार्थी माहिती / यादी पासवर्ड ने सुरक्षित केलेल्या फाईल स्वरूपात मोबाईल मध्ये जतन करता येईल . सदरील फाईल नंतर इम्पोर्ट करून ऍप मधील निवडलेल्या वर्गात, नवीन वर्गात केंव्हाही इम्पोर्ट करून घेता येते. त्यामुळे दरवर्षी किंवा ऍप डिलीट झाल्यामुळे पुन्हा नव्याने माहिती भरण्याची गरज नाही . एका क्षणात तुमचा वर्ग तयार होईल .३. विद्यार्थी मूल्यमापन
👉🏻 वर्गाशी संबंधित चाचणी, लेखी परीक्षा, सराव परीक्षा, प्रात्यक्षिके, प्रकल्प इत्यादी आकारिक व संकलित मूल्यमापनाचे गुण नोंद करण्याची सोय. गुण नोंदी वेगाने व्हाव्यात म्हणून गुण नोंदी करण्यासाठी बाण असलेला कीबोर्ड उपलब्ध केला आहे. गुण टाकून 'पुढील' बाण वर क्लिक केल्यास लगेच पुढील विद्यार्थ्यांचे गुण टाकता येतात. प्रत्येक चाचणी/मूल्यमापन साधनांच्या गुण नोंदीसाठी प्रथम 'नवीन चाचणी' तयार करा . व नंतर गुण नोंद करा .👉🏻 वेळोवेळी सर्व मूल्यमापनाचे गुण नोंद करून झाल्यानंतर सत्रअखेर विषयनिहाय, आपोआप होणाऱ्या सर्व बेरजा, श्रेणी देणे, व एकूण टक्केवारीसह संपूर्ण निकाल तक्ता तयार होतो. आणि या तक्त्याची एक्सेल फाईल ही ऍप मधूनच एका क्लिक द्वारे जनरेट करता येते. तसेच जात / विषय / विद्यार्थीनिहाय निकाल गोषवारा इत्यादी माहिती आपोआप तयार होईल , हि माहिती सुद्धा एक्सेल फाईल स्वरूपात एका क्लिक वर तयार होईल.
४. विद्यार्थी हजेरी व पालक संपर्क
👉🏻 ऍप द्वारे काही क्षणात विद्यार्थी हजेरी नोंदवता येते. सकाळ, दुपार, सायंकाळ, जादा तास अशा एकाच दिवसाच्या विविध हजेरी वेगवेगळ्या नोंदवता येतात. नोंदवलेली हजेरी डिलीट, करण्याची, केंव्हाही बदलण्याची सोय उपलब्ध आहे. महिनाअखेर एकूण कामाचे दिवस, विद्यार्थीनिहाय एकूण हजर दिवस, गैरहजर दिवस, वार्षिक हजर दिवस , सरासरी हजेरी, सरासरी विद्यार्थी संख्या, हजर टक्केवारी, अशी माहिती असलेले मासिक हजेरीपत्रक तक्ता आपोआप तयार होईल. प्रत्येक हजेरी प्रकारासाठी (सकाळ , दुपार , इत्यादी) वेगळा तक्ता तयार करता येतो. महिनाअखेर हा मासिक हजेरी तक्ता एक्सेल फाईल स्वरूपात एका क्लिक वर तयार करण्याची व मोबाईल वर सेव्ह करण्याची सोय उपलब्ध आहे.👉🏻 महिना अखेर विद्यार्थी निहाय मासिक हजर दिवस, गैरहजर दिवस, टक्केवारी थेट पालकांच्या व्हाट्सअँप वर पाठवता येतात. त्यामुळे वर्गाची / विद्यार्थ्यांची हजेरी वाढण्यासही हे ऍप उपयुक्त असेल .
👉🏻 थेट पालक संपर्क - पालकांचे संपर्क क्रमांक फोन च्या कॉन्टॅक्ट मध्ये सेव्ह न करताही या ऍप मधून थेट पालकांना फोन लावता येईल, तसेच पालकांशी व्हाट्स ऍप संवादही साधता येईल.
👉🏻 अनेक वर्गांची एकाच ऍप मध्ये माहिती सेव्ह करण्याची सोय
५. डेटा सुरक्षा व बॅकअप
👉🏻 विद्यार्थी माहिती / यादी पासवर्ड द्वारे सुरक्षित करून एक्स्पोर्ट / इम्पोर्ट करण्याची सोय: जर तुम्ही विद्यार्थी यादी आपल्या मोबाईल वर एक्स्पोर्ट करून ठेवली असेल तर, जरी क्लास मॅनेजर ऍप चुकून डिलीत झाले किंवा वर्गातील विद्यार्थी पुढील वर्गात घ्यायचे असतील (विद्यार्थी प्रमोशन) ही सुविधा खूप उपयुक आहे. सदरील एक्स्पोर्ट केलेल्या माहितीमध्ये फक्त विद्यार्थ्यांची माहिती एक्स्पोर्ट होईल, हजेरी व मूल्यमापनाचे गुण विषयक माहिती एक्स्पोर्ट होणार नाही.
सूचना - जर आपण एक्स्पोर्ट करताना फाईल ला दिलेला पासवर्ड विसरलात तर तुम्ही सदरील विद्यार्थी माहिती इम्पोर्ट करू शकणार नाही.
👉🏻 संपूर्ण ऍप ची माहिती एक्स्पोर्ट करण्यासाठी ऍप च्या सेटिंग मधून 'डेटाबेस जतन करा' वर क्लिक करा, डेटा सुरक्षा पासवर्ड तयार करा व नंतर डेटाबेस फाईल तुमच्या फोन च्या मेमरी मध्ये जतन (सेव्ह ) करा. काही कारणामुळे ऍप डिलीट झाल्यास किंवा इतर कारणांसाठी, सदरील जतन केलेला डेटाबेस, याच ऍप सेटिंग मधून अथवा 'शाळा माहिती' भरण्यासाठी येणाऱ्या स्क्रीन वरून, 'रिस्टोअर(पुनर्स्थापित) डेटाबेस' वर क्लिक करून, तुमच्या फोन मेमरी सेव्ह केलेली डेटाबेस फाईल निवडा, फाईल बनवताना आपण फाईल जतन तयार केलेला पासवर्ड टाका. व यशस्वी पुनर्स्थापण संदेश डायलॉग मधील 'रिस्टार्ट ऍप' वर क्लिक करा. तुमच्या ऍप मध्ये डेटाबेस जतन करते वेळी असलेली सर्व माहिती पुन्हा पुनर्स्थापित होईल.
सूचना - जर आपण एक्स्पोर्ट करताना फाईल ला दिलेला पासवर्ड विसरलात तर तुम्ही सदरील विद्यार्थी माहिती इम्पोर्ट करू शकणार नाही.
आजच डाउनलोड करा आणि आपले काम सोपे करा! प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉🏻 जाहिराती नसलेले, व विद्यार्थी ID कॉर्ड pdf बनवणे, विद्यार्थी यादी pdf बनवणे, स्वतः निवडलेल्या माहितीसह विद्यार्थी यादी एक्सेल बनवणे(Custom Student List excel file Generation) अशा अँडव्हान्स फीचर सह आपल्या शाळेसाठी/वर्गासाठी क्लास मॅनेजर ऍप मिळवण्यासाठी संपर्क करा 👉🏻 9552913224